राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे समोरासमोर आले. मात्र याआधीही अधिवेशनात अशा अनेक घटना समोर आल्यात, जेव्हा प्रकरण पार टोकाला गेलं होत.